शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन [ प्राथमिक आणि माध्यमिक ]

मा. विवेक सावंत
मा. विवेक सावंतमुख्य समन्वयक
शिक्षण उद्यासाठी असते. उद्याचे सुजाण, सतर्क, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे खऱ्या, उचित व उत्तम शिक्षणाकडून अपेक्षित असते. शिकावे कसे, शिकण्याचा आनंद कसा घ्यावा-द्यावा आणि आजन्म शिकत कसे राहावे हे शिकविते ते खरे शिक्षण. शिकता-शिकता जे उद्याची आव्हाने पेलायला सज्ज करते, उद्याच्या संधींचे सोने करायला शिकवते ते खरे शिक्षण. एकविसाव्या शतकातील एकविसाव्या वर्षापासून शालेय शिक्षणाच्या मुलभूत पुनर्रचनेची या दृष्टीने नितांत आवश्यकता आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण - २०२० मधील मूल्यांकन

राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२०मध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची प्रभावी अंमलबजावणी, त्यामधील साधने व तंत्रांचा परिणामकारक रीतीने उपयोग करावा, असे सुचविले आहे.मूल्यांकनाचे ध्येय सातत्यपूर्ण आणि आकारिक क्षमता आधारित असावे, असेही अपेक्षित आहे .चिकित्सक विचार,वैचारिक स्पष्टता,विश्लेषण क्षमता या उच्च बोधात्मक क्षमतांची तपासणी हे मूल्यांकनातून अपेक्षित आहे. ( संदर्भ :४. ३४ राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२० ) राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०मध्ये मूल्यांकन हे अध्ययन आणि विकास यांना गती देणारे आहे.

विद्यार्थ्यांचे अध्ययन योग्य तऱ्हेने व्हावे ,शिक्षक, विद्यार्थी आणि संपूर्ण शालेय शिक्षण प्रणालीला फायदा व्हावा अशी मूल्यांकन प्रक्रिया असावी. सर्व विद्यार्थ्यांसाठी अध्ययन आणि विकास अनुकूल करण्यासाठी अध्ययन -अध्यापन प्रक्रियेत सातत्याने सुधारणा करण्यास हे मूल्यांकन मदत करेल. शिक्षणाच्या सर्व स्तरांसाठी मूल्यांकनाचे हे मूलभूत तत्त्व असेल.राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा-२०२३ यांमध्ये मूल्यांकन प्रक्रियेचे विश्लेषण वरीलप्रमाणे करण्यात आलेले आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई ,शिक्षण विकास मंच यांच्यावतीने यावर्षी शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी शालेय शिक्षणातील मूल्यांकन प्रक्रियेला केंद्रस्थानी मानून शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.या फेलोशिपसाठी आपण निवडलेल्या विषयाच्या माध्यमातून मूल्यांकन प्रक्रियेतील नवोपक्रम पूर्णत्वास जाईल व तो नवोपक्रम इतर शिक्षकांना मार्गदर्शक ठरेल.शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी शालेय स्तरावरील मूल्यांकन प्रक्रियेच्या विविध पैलूंवर नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून मूल्यांकन विषयक प्रकल्पासाठी काम करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी ही एक पर्वणी असेल.यामधून क्षमताआधारित मूल्यांकन प्रक्रियेच्या विविध पैलूंवर अधिकाधिक परिणामकारक पद्धतीने काम करता येईल.

फेलोशिपसाठी माहिती तपशील
फेलोशिपसाठी वयोमर्यादा वय वर्षे ४५ किंवा त्यापेक्षा कमी वय असणारे पूर्णवेळ शिक्षक
फेलोशिपचा कालावधी मे २०२६ ते एप्रिल/मे २०२७
फेलोशिपसाठी पात्रता
  1. Themes मध्ये अंतर्भूत केलेल्या उद्दिष्टांशी सुसंगत, नियमित अध्यापन करत विद्यार्थ्यांच्या सहभागाने चालणारे.
  2. वर्षभर विकसित होत जातील असे अभ्यासक्रमेतर व वेळापत्रकेतर उपक्रम करत असलेले/करू इच्छिणारे शिक्षक अर्ज करण्यासाठी पात्र समजण्यात येतील. तसेच २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात बदली न होणाऱ्या शिक्षकांनी अर्ज करावा.
फेलोशिपची संख्या २० प्राथमिक आणि १० माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक असे एकूण ३०
अर्जदारांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र असेल
फेलोशिपची रक्कम निवड झालेल्या प्रत्येक शिक्षकास वार्षिक ६०,०००/- (रुपये साठ हजार फक्त). यातील ६०% रक्कम शिक्षकांना प्रत्यक्षात फेलोशिपमधील उपक्रमांसाठी लागणारी साधने, संभाव्य प्रवास, इत्यादीसाठी देण्यात येईल आणि उर्वरित ४०% रक्कम ही कार्यशाळा आणि मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनासाठी खर्च करण्यात येईल.

१) आपण ज्या संस्थेत काम करीत आहात त्या संस्थेचे ‘नवोपक्रम’ करण्यासाठी तुम्हाला परवानगी दिल्याचे पत्र सुरुवातीसच द्यावे लागेल.

२) आपण जो नवोपक्रम हाती घेणार आहात तो यापूर्वी केलेला नसावा. मात्र पूर्वी केलेल्या प्रयोगाचे विस्तारीकरण (Extension ) करता येईल.

३) आपण करीत असलेला नवोपक्रम इतर कोणत्याही संस्थेत सादर केलेला नसावा तसेच पुढेही तो सादर करता येणार नाही.

४ ) आपण घेतलेला उपक्रम कोणाचीही कॉपी असू नये. जर दुसऱ्याची एखादी कल्पना घेवून काम करणार असाल तर तशी त्या व्यक्तीची पूर्वपरवानगी घेतलेली असावी.

५ ) यशवंतराव चव्हाण सेंटर, ज्या ज्या वेळी यासंबंधीची प्रशिक्षणे किंवा बैठका घेईल त्यावेळी अशा बैठकास किंवा प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक राहील. अपरिहार्य अडचण असेल तर तशी कल्पना यशवंतराव चव्हाण सेंटरला देवून परवानगी घ्यावी.

६ ) यशवंतराव चव्हाण सेंटरनी दिलेल्या वेळेतच आपला उपक्रम पूर्ण करणे अपेक्षित आहे. उपक्रमास उशीर झाला तर आपल्या फेलोशिपबाबतचा अंतिम निर्णय चव्हाण सेंटरला असेल.

७ ) आपला उपक्रम चालू असताना यशवंतराव चव्हाण सेंटरचे प्रतिनिधी कधीही तरीही पूर्व कल्पना देवून भेट देण्यास येतील. त्यावेळी त्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. जर या प्रतिनिधिंना कामाबाबत चुकीच्या गोष्टी ध्यानात आल्या तर फेलोशिप संबंधी यशवंतराव चव्हाण सेंटर निर्णय घेईल.

८) नवोपक्रम अंतिम अहवाल सादर करताना आपल्या संस्था प्रमुखाचे पत्र जोडणे आवश्यक आहे.

१. इच्छुक शिक्षकांनी दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ पूर्वी https://apply.sharadpawarfellowship.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा
२. अर्जदारांनी फेलोशिपसाठी हाती घेत असलेल्या नवोपक्रम विषयी खालील मुद्दयांच्या आधारे सुमारे १००० शब्दांमध्ये (मराठी किंवा इंग्रजी भाषेत) अर्जामध्ये दिलेल्या जागेत लिहावे.
  • २.१ उपक्रमाचे शीर्षक
  • २.२ उपक्रमाची गरज आणि महत्त्व – उपक्रम निवडण्याचे कारण, वेगळेपण आणि उपयुक्तता याबाबतचा तपशील
  • २.३ उपक्रमाची उद्दिष्टे – हा उपक्रम आपण का निवडला आणि त्याचा काय फायदा, कोणाला होणार आहे, कशाप्रकारे होणार याबाबतचा तपशील.
  • २.४ उपक्रमाची वैशिष्ट्ये –
    • अ. उपक्रमपूर्व स्थिती
    • आ. संबंधित व्यक्ती/तज्ज्ञ यांच्याशी चर्चा
    • इ. उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या साधनांचा विचार
    • ई. उपक्रमांतर्गत कृतींचे टप्पे आणि त्यांचे क्रम (संभाव्य वेळापत्रकासह)
    • उ. अपेक्षित उपक्रमोत्तर कृती
    • ऊ. उपक्रमाची अंमलबजावणी केल्याबद्दल सादर करावयाचे पुरावे
  • २.५ उपक्रमाची अपेक्षित फलनिष्पत्ती
३. आपण प्रस्तावित करीत असलेला उपक्रम हा नवीन असावा.
निवड प्रक्रिया
  1. तज्ज्ञ समितीकडून अर्जांची छाननी पूर्ण करण्यात येईल.
  2. पात्रतेचे निकष अधिक गुणवत्तेने पूर्ण करणाऱ्या मोजक्याच शिक्षकांची तज्ज्ञांतर्फे (आवश्यकतेनुसार शाळाभेटीसह) प्रत्यक्ष/ दूरस्थ मुलाखतींसाठी निवड करण्यात येईल.
  3. मुलाखत शक्यतो इच्छुक शिक्षकांनी अर्जासोबत पाठविलेल्या टिपणावर आधारित असेल.
  4. मुलाखतीच्या गुणवत्तेच्या मूल्यमापनानुसार फेलोशिपसाठी ३० शिक्षकांची (२० प्राथमिक आणि १० माध्यमिक शिक्षक) निवड करण्यात येईल.
  5. निवड झालेल्या शिक्षकांशी संपर्क साधून त्यांची फेलोशिप स्वीकारण्याविषयीची लेखी अनुमती घेण्यात येईल.
  6. आवश्यकतेनुसार त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचीही सहसंमती घेण्यात येईल.
पूर्वतयारी:

जानेवारी २०२६ ते मे २०२७ या कालावधीत खालील गोष्टी करण्यात येतील:

  1. निवड झालेल्या फेलोजचे किमान ३ दिवसांचे प्रशिक्षण शिबीर.
  2. फेलोने हाती घ्यावयाच्या उपक्रमांचे सादरीकरण व चर्चेअंती निश्चिती, फेलोच्या नियोजित उपक्रमांचे व त्यांच्या मूल्यमापनाचे नियोजन, संसाधनांची जुळवाजुळव तसेच सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड, पालकांची अनुमती, मासिक व अंतिम प्रकल्प-अहवालांची रूपरेषा, इ.
  3. गट निहाय मेंटर्स नेमणे.
फेलोशिपमधील उपक्रमाचा कालावधी:
  1. मे २०२६ ते मे २०२७ असेल.
  2. या कालावधीत फेलोजनी वर निश्चित केलेले उपक्रम करून त्यांचे मासिक अहवाल प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला देणे अनिवार्य राहील.
  3. एप्रिल २०२७ मध्ये फेलोजनी सविस्तर अहवाल लेखन करून संयोजकांकडे पाठविणे अपेक्षित आहे. (हार्ड आणि सॉफ्ट कॉपी)
फेलोशिप सांगता शिबीर:
  1. एप्रिल/मे २०२७ मध्ये २ दिवसांचे सांगता शिबीर आयोजित करण्यात येईल.
  2. या शिबिरामध्ये सर्व फेलोज् चे त्यांच्या मार्गदर्शकांच्या उपस्थितीत सादरीकरण होईल व त्यावर इतर तज्ज्ञांबरोबर चर्चाही होतील. त्यात फेलोशिपनंतर शैक्षणिक परिवर्तनाच्या प्रयत्नांचे सातत्य राखण्याविषयी सूचना देण्यात येतील.
  3. प्रशस्तीपत्रांचे वितरण व फेलोज् नी केलेल्या उपक्रमांचे फेलोशिप पोर्टलवर प्रकाशन करण्यात येईल. पुढे पोर्टलला योग्य ती प्रसिद्धी देऊन राज्यातील विशेषत: विद्यार्थी, पालक व शिक्षकांपर्यंत ते उपक्रम पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
  4. या पोर्टलवर फेलोज् चे ब्लॉग्ज, इतर शिक्षकांचे प्रतिसाद, सूचना, प्रश्नांना उत्तरे, इ. सेवा सुरू करता येतील. उत्तरोत्तर या पोर्टलवर अशा उपक्रमांची महासूची तयार होईल व शैक्षणिक परिवर्तन करू इच्छिणाऱ्या शेकडो शिक्षकांना ती मार्गदर्शक व स्फूर्तीदायक ठरेल.

फेलोशिपच्या अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक

क्रमांक कार्यक्रम दिनांक
1 फेलोशिपची घोषणा १५ ऑगस्ट २०२५
2 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत १५ ऑगस्ट २०२५ ते १२ ऑक्टोबर २०२५
3 आलेल्या अर्जाची छाननी आणि निवडक उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती १३ ऑक्टोबर २०२५ ते २० नोव्हेंबर २०२५
4 अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची घोषणा १ डिसेंबर २०२५
5 फेलोशिप प्रदान सोहळा कार्यक्रम १४ डिसेंबर २०२५

फेलोशिपचा कालखंड: मे २०२६ ते मे २०२७

क्रमांक कार्यक्रम दिनांक
1 फेलोज सोबत ऑनलाईन मिटींग १८ जानेवारी २०२६
2 प्रथम कार्यशाळा ८, ९, १० मे २०२६
3 प्रकल्पाना भेटी डिसेंबर २०२६ ते जानेवारी २०२७
4 द्वितीय कार्यशाळा २१, २२ नोव्हेंबर २०२६
5 तृतीय कार्यशाळा ६, ७ फेब्रुवारी २०२७
6 अंतिम कार्यशाळा आणि अहवाल सादरीकरण मे २०२७

योगेश कुदळे

शिक्षण विभाग प्रमुख

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

फोन नं: +91 93707 99791

ई-मेल आयडी – education@chavancentre.org

संजना पवार

सहाय्यक, शिक्षण विभाग

संपर्क – 8291416216

अरविंद शिंगाडे9423445668

‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन’ साठी आपण जो विषय निवडणार आहात त्याबाबत आपल्या काही शंका असतील तर अरविंद शिंगाडे (9423445668) यांना व्हॉट्सॲप मॅसेज करून विचाराव्यात.