शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन साहित्य

राष्ट्राला स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करायची असेल, एक अद्वितीय नाममुद्रा निर्माण करायची असेल तर आपल्याला सांप्रत आव्हानांवर आणि भविष्यातील संधींवर लक्ष केंद्रित करत असताना, आपल्या समृद्ध सांस्कृतिक भूतकाळाशी असलेलीनाळ जपणे महत्त्वाचे आहे.भारत देश, आपल्या समृद्ध संस्कृतीसाठी आणि वैविध्यपूर्णतेसाठीओळखला आणि वाखाणलाजातो.

हा भारत अनुभवण्यासाठी साहित्यिक आणि कलात्मक अभिव्यक्तींचा आस्वाद घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. उद्याचे नेतृत्व करणाऱ्या आणि परिवर्तन घडवणाऱ्या पिढीला या समृद्ध संस्कृती आणि वारशाबद्दल अवगत केले तरच ते भारताचा महान वारसा पुढे नेऊ शकतील.

युवा पिढीनेदेशी भाषांतील साहित्याचे क्रांतिकारकत्व जाणून घेणे आणि आधुनिक संदर्भात त्याची मांडणी करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

 डॉ. नीतीन रिंढे
डॉ. नीतीन रिंढेमुख्य समन्वयक
महाराष्ट्र आज ज्या क्षेत्रांत अव्वल आहे,त्यांपैकी एक क्षेत्र म्हणजे साहित्य. मराठी साहित्याची साडेसातशे वर्षांची सशक्त परंपरा केवळ मराठी समाजालाच नव्हे, तर भारतीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाचकांनाही जीवनरस पुरवत आहे. परिवर्तनवादी, आधुनिक मूल्यांवर विकास पावलेल्या महाराष्ट्रीय संस्कृतीच्या जडणघडणीत मराठी साहित्याचा मोठा वाटा आहे. प्रत्येक काळात होणाऱ्या सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतरांचे आव्हान पेलून त्यांना हवी ती दिशा देण्याची ताकद मराठी साहित्याने वेळोवेळी दाखवली आहे.
मराठी साहित्याचा वारसा जपण्यासाठी संघटनात्मक पातळीवर अधिक गांभीर्यानेप्रयत्न आणि रचनात्मक प्रयोग करणे अत्यावश्यक आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढती संख्या, अत्यंत स्पर्धात्मक वातावरण आणि विविध माध्यमांचा स्फोट या सर्वाच्या प्रभावामुळे तरुण पिढी मराठी साहित्यापासून आणि वाचन-लेखन-संशोधन संस्कृतीपासून दूर जात आहे. या पार्श्वभूमीवर मातृभाषा मराठीच्या सर्वंकष उन्नतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल आणि सोशल मीडियाचा वापर हा एक चांगला मार्ग ठरू शकतो. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत काही नवोदित लेखक नवनवे विषय हाताळत असतात खरे;पण अशा लेखकांचे प्रमाण तितकेसे समाधानकारक म्हणता येणार नाही. त्यामुळेच तरुण पिढीत नवे लेखक निर्माण व्हावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील उपजत लेखनप्रतिभा बहरावी यासाठी निश्चित कृतिकार्यक्रम देणे या उद्देशाने यशवंतराव चव्हाण सेंटरने 'शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप' सुरू केली आहे. 'ध्यास सर्वोत्तमचा, शोध युवा लेखकांचा' (परिपूर्णतेचे लक्ष्य, तरुण लेखकांच्या शोधात) हे या साहित्य फेलोशिप चे ब्रीदवाक्य आहे.
  • प्रतिभावान तरुण लेखकांचा शोध घेऊन त्यांना साहित्य फेलोशिप द्वारे सर्जनशील लेखनासाठी व्यासपीठ प्रदान करणे.
  • लेखकांना पाठ्यवृत्तीच्या काळात नियोजनबद्ध मार्गदर्शन करणे व त्यांच्या लेखनाला योग्य दिशा देणे.
  • तज्ज्ञ समितीने मंजूर केलेले लेखकांचे लेखन पुस्तकरूपात प्रकाशित करण्यास संबंधित लेखकांना प्रोत्साहित करणे आणि मदत करणे.
ऑफर :
  1. पाठ्यवृत्ती प्राप्त लेखकांना अनुदान. यात प्रवास/निवासी भत्ता आणि पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आंशिक आर्थिक साहाय्य याचाही समावेश असेल.
  2. लेखन प्रक्रियेतील समस्या दूर करून लेखन कौशल्ये विकसित करण्यासाठी,आवश्यक त्या संशोधनासाठी पाठ्यवृत्ती प्राप्त लेखकाला स्वतंत्र मार्गदर्शक.
  3. लेखनासंदर्भातले मार्गदर्शन वर्ग आणि मराठीतील यशस्वी समकालीन लेखकांशी खुल्या चर्चांची संवादसत्रे.
  1. दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्याही एका प्रकारात स्वतंत्र पुस्तक लिहिण्यास किंवा पुस्तक भाषांतरित करण्यास इच्छुक कोणीही मराठी भाषक तरुण लेखक-लेखिका अर्ज करू शकतात.
  2. वयोमर्यादा : ११ ऑगस्ट २०२२ रोजी वयाची ३५ वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा कमी.
  • शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती ही संशोधन प्रकल्पासाठी नसून साहित्य लेखनासाठी आहे. हे लक्षात घेऊन, ललितेतर साहित्य (nonfiction) या प्रकारातील लेखनासाठीचे विषय निश्चित करावेत.
  • इतरत्र पदवीसाठी वा अन्य कारणासाठी सादर केलेले साहित्य या पाठ्यवृत्तीसाठी स्वीकारले जाणार नाही. पाठ्यवृत्ती जाहीर झाल्यानंतर तसे आढळल्यास त्या लेखकाला दिलेली पाठ्यवृत्ती कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. पाठ्यवृत्तीधारक लेखकाने निवडलेल्या विषयावर स्वतंत्रपणे नव्याने लेखन करणे आवश्यक आहे.

  • शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप साठी इच्छुक लेखक खालीलपैकी कोणताही एक साहित्य प्रकार निवडू शकतात.
    1. कादंबरी किंवा दीर्घकथा.
    2. नाटक.
    3. ललितेतर साहित्य (चरित्र, सामाजिक शास्त्रांशी संबंधित किंवा लोकसाहित्याशी संबंधित इत्यादी).
    4. कोणत्याही भारतीय किंवा विदेशी भाषेतून मराठीत अनुवाद (ललित गद्य अथवा ललितेतर गद्य).
    5. विज्ञान साहित्य (ललित गद्य अथवा ललितेतर गद्य).
    6. बालसाहित्य (ललित गद्य अथवा ललितेतर गद्य)

  • पाठ्यवृत्तीचे स्वरूप :
    1. निवड झालेल्या लेखकाला लेखनासाठी पाठ्यवृत्ती रु.५०,०००/-
    2. पाठ्यवृत्तीच्या कालावधीत इतर खर्चासाठी सहाय्य रु. ५०,०००/-
      • पाठ्यवृत्तीच्या कालावधीत होणाऱ्या अभिमुखता कार्यक्रम, संवाद-सत्रे यांसाठी प्रवास आणि निवास खर्च
      • लेखकासाठी नेमलेल्या मार्गदर्शकांचे मानधन व प्रवासखर्च
      • निवड समितीच्या मान्यतेनंतर पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अर्थसाहाय्य
विहित मुदतीत आलेल्या अर्जांचे आणि नमुना मजकुराचे तज्ज्ञ परीक्षकांमार्फत परीक्षण करून, आवश्यक वाटल्यास अर्जदार लेखकांच्या मुलाखती घेण्यात येतील आणि अंतिमतः
एकूण १० युवा लेखक-लेखिकांची निवड तटस्थपणे करण्यात येईल. स्त्री उमेदवारांना समान संधी दिली जाईल. निवड करताना गुणवत्ता, इच्छुकाने दाखवलेले गांभीर्य व शिस्त हेच निकष कटाक्षाने असतील.

 

११ ऑगस्ट २०२२

कार्यशाळेचे वेळापत्रक जाहीर

११ ऑगस्ट २०२२

१२ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर २०२२

ऑनलाइन फॉर्म सबमिशन

१३ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२२

छाननी आणि निकालाची तयारी

१३ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२२

११ नोव्हेंबर २०२२

निकालाची घोषणा

११ डिसेंबर २०२२

फेलोशिप प्रदान सोहळा कार्यक्रम

११ डिसेंबर २०२२

पाठ्यवृत्तीचा कालावधी - डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३

१० डिसेंबर २०२२

पहिली कार्यशाळा

१० डिसेंबर २०२२

१८ - १९ फेब्रुवारी २०२३

दुसरी कार्यशाळा

२७ - २८ मे २०२३

तिसरी कार्यशाळा

२७ - २८ मे २०२३

०१ - ०२ ऑक्टोबर २०२३

चौथी कार्यशाळा

१० नोव्हेंबर २०२३

अंतिम सादरीकरण

१० नोव्हेंबर २०२३

    पाठ्यवृत्तीसाठी निवड झालेल्या लेखकांसाठी पहिला अभिमुखता कार्यक्रम १० डिसेंबर २०२२ ला घेतला जाईल.

    पाठ्यवृत्तीसाठीअर्ज करण्याचा कालावधी १२ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर २०२२ असा आहे.१३ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२२ या काळात अर्जांची छाननी केली जाईल.

    ११ नोव्हेंबर २०२२ रोजी पाठ्यवृत्ती प्राप्त लेखकांची नावे जाहीर केली जातील. ११ डिसेंबर २०२२ रोजी समारंभपूर्वक पाठ्यवृत्ती प्रदान केली जाईल.

    पाठ्यावृत्तीचा कालावधी १० डिसेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२३.

    पाठ्यवृत्ती प्राप्त दहा लेखक-लेखिकांनी पूर्ण केलेल्या लेखनाची अंतिम प्रत १० नोव्हेंबर २०२२ रोजी निवड समितीकडे सादर करायची आहे. त्याचे मूल्यमापन केल्यानंतर ११ डिसेंबर २०२२ रोजी या लेखनाचा अहवाल सादर केला जाईल. त्याचप्रमाणे, पुढील वर्षीच्या पाठ्यवृत्तीसाठी निवडलेल्या दहा लेखक-लेखिकांची नावे देखील जाहीर केली जातील.

    पाठ्यवृत्तीसाठी इच्छुक असलेल्या लेखकांनी www.sharadpawarfellowship.com या संकेतस्थळावरीवल अर्ज योग्य रीतीने भरावा. आवश्यक तो तपशील उदाहरणार्थ, नाव, पत्ता, संपर्क, शाळा, महाविद्यालय, नोकरी-व्यवसाय यांचा उल्लेख करावा.आपल्याला प्रभावित केलेल्या तीन लेखकांबद्दल ३०० ते ५०० शब्दांचा मजकूर लिहावा. शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती मिळविण्यामागचे आपले उद्दिष्ट काय आहे, ते २०० शब्दांत लिहावे.

    इच्छुक लेखकांनी त्यांच्या नियोजित लेखनाविषयीची सारांश रूपाने कल्पना आणि नमुना लेखन पीडीएफ स्वरूपात अर्जासोबत पुढीलप्रमाणे जोडायचे आहे : लेखनविषयाची सारांश रूपाने कल्पना सुमारे ५०० शब्दांत आणि त्याचे नमुना लेखनाचे एक प्रकरण (सुमारे २००० शब्दांत). पाठ्यवृत्ती ‘भाषांतर’ या प्रकारासाठी हवी असल्यास,‘लेखनविषयाची सारांशरूपाने कल्पना’ या सदराखाली मूळ पुस्तकाचे नाव, लेखक, प्रकाशक, आवृत्तीचे प्रकाशन वर्ष इत्यादी तपशिलासह पुस्तकातील आशयाचा सारांश पीडीएफ स्वरूपात सुमारे ५०० शब्दांत द्यावा. त्या पुस्तकातील एका प्रकरणाचे मराठी भाषांतर (सुमारे २००० शब्द)पीडीएफ स्वरूपात जोडावे.

सल्लागार मंडळ

      न्या. नरेंद्र चपळगावकर
      श्री. रंगनाथ पठारे
      श्री. वसंत आबाजी डहाके
      प्रा. प्रभा गणोरकर
      डॉ. रमेश वरखेडे
      श्री. दिनकर गांगल

संयोजन समिती

      श्री. दत्ता बाळ सराफ
      श्री. अनिल पाझारे
      श्री. चेतन कोळी
      श्री. किरण येले
      श्री. रवींद्र झेंडे

संवादक (समकालीन लेखक)

      श्री. प्रणव सखदेव
      शर्मिला फडके
      श्री. अवधूत डोंगरे
      शिल्पा कांबळे
      श्री. बालाजी सुतार
      श्री. किरण गुरव
      श्री. ह्रषिकेश गुप्ते
      श्री. बालाजी मदन इंगळे